धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील शिक्षक कॉलनी भन्साळी व्हिला येथे संस्कार भारती देवगिरी प्रांत पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्हा संस्कार भारती जिल्हा पदाधिकारी यांची बैठक संपन्न प्रथम ध्येय गीतानी सुरुवात झाली त्यानंतर प्रांत पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले . प्रांत कोष प्रमुख मोहन राव तोळे यांनी धुळे येथे संपन्न होणाऱ्या सर्वसाधारण सभेबाबत सविस्तर माहिती सांगितली त्यानंतर प्रांत सहकोषमुख ॲड.संजय घायाळ यांनी सभासद नोंदणी तसेच आर्थिक वर्ष 2025चा लेखा जोखा विस्तारित मांडला व दैनंदिनी 2025- 26 प्रमुख शेषनाथ वाघ यांनी हिशोब सादर केला . या प्रसंगी देवगिरी प्रांत मातृशक्ती प्रमुख गीता रावतोळे, प्रांत सह महामंत्री डॉ. सतिश महामुनी , प्रांत दृष्य कला संयोजक शेषनाथ वाघ ,प्रांत फोटोग्राफी सह संयोजक पद्माकर मोकाशे, जिल्हा संरक्षक प्रभाकर चोराखळीकर , जिल्हाकार्याध्यक्ष अनिल ढगे,माजी अध्यक्ष पं. दिपक लिंगे, जिल्हाप्रमुख श्यामसुंदर भन्साळी, जिल्हा सचिव दिपक महामुनी, जिल्हा सहकोषप्रमुख अविनाश धट, जिल्हा संगीत संयोजक सुरेश वाघमारे, जिल्हा मंचीय संयोजक प्रविण गोरे, धाराशिव शहर समिती संयोजक शरद वडगाकर, धनंजय जेवळीकर, महादेव केसकर, अक्षय भन्साळी,सौ. ज्योती भन्साळी, सौ.अंकिता बलदवा,कु.आग्या बलदवा उपस्थित होते. प्रसायदानाने बैठकीची सांगता होऊन सुत्रसंचलन शेषनाथ वाघ यांनी केले तर आभार अक्षय भन्साळी यांनी मानले.
Related Posts
- जिल्हयात विविध ठिकाणी वीज सुरक्षेचा जागर; महावितरणचा विद्युत सुरक्षा सप्ताह03 Jun 20250
धाराशिव (प्रतिनिधी)- महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन राज्यभरात १ ते ६ जून दरम...Read more »
- 16.54 कोटींच्या पायाभूत कामांचा आमदार पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ03 Jun 20250
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील पहिल्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीसाठी कौडगाव येथे महत्त्वपूर्ण आशा पायाभूत कामांचा सोमवारी आमदार राणाजगजितसि...Read more »
- जमिनी नाही म्हणून योजना नाही तर दुसरीकडे जमिनी आहे त्याचा मावेजा नाही03 Jun 20250
धाराशिव (प्रतिनिधी)- म्हाडाची घरकूल योजना राबविण्यासाठी गेल्या एक वर्षापासून अधिकारी वर्ग धाराशिव जिल्ह्यात जमिनीसाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांना...Read more »
- कर्तव्यावर हजर न राहिल्यामुळे कर्मचारी निलंबीत03 Jun 20250
भूम (प्रतिनिधी)- भूम आगारात कर्तव्यावर हजर न झाल्यामुळे भूम आगारातील तीन वाहक, एक चालक कम वाहक, व एक सहाय्यक कारागीर आगार प्रमुखांनी (ता. 2) जून रोजी ...Read more »
- सर्व सेवानिवृत्तांना आवाहन03 Jun 20250
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्ताना धाराशिव जिल्हा निवृत्तीवेतनधारक संस्था, धाराशिव तर्फे आवाहन करण्यात येते की सेवानिवृत्ती ...Read more »
- धाराशिवच्या नुतन पोलीस अधीक्षक रितु खोकर यांचा सत्कार03 Jun 20250
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अधिक चांगली करण्याच्या उद्देशाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल...Read more »