धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्ताना धाराशिव जिल्हा निवृत्तीवेतनधारक संस्था, धाराशिव तर्फे आवाहन करण्यात येते की सेवानिवृत्ती पश्चात सेवानिवृत्ताना येणाऱ्या अडचणी, वेतन विषयक अडचणी तसेच व्यक्तिगत आणि शासकीय पातळीवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी संस्था कार्यरत असून समता कॉलनी धाराशिव येथे सार्वजनिक बांधकाम कार्यालयाजवळ सेवा भवन हे संकुल असून दरमहा सेवानिवृत्ती विषयक वेतनधारकांच्यासाठी समस्यांचे निवारण करण्यात येते.
तसेच जिल्हा शासकीय कोषागार कार्यालय येथे बैठकीचे आयोजन तसेच पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात येते. विभाग आणि राज्य पातळीवर अधिवेशनात सहभाग घेऊन प्रश्नाची सोडवणूक करण्यात येते त्याच प्रमाणे सेवानिवृत्ती धारकांच्या वतीने न्यायालय व कार्यालयीन पातळीवर सामूहिक प्रयत्नाद्वारे समस्यांचे निराकरण करण्यात येते. तरी या अधिकृत नोंदणी कृत संस्थेचे सभासद होऊन संस्थेचे सहकार्य अधिकृतरित्या प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत धाराशिव निवृत्ती वेतनधारक संस्था धाराशिव साठी दर तीन वर्षांनी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येत असून तज्ञ, कार्य तत्पर आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे पदाधिकारी यांची निवड करण्यात येते सध्या जिल्हाध्यक्ष म्हणून प्रशांत जाधव (9850966770) सेवानिवृत्त सहाय्यक लेखाधिकारी, जिल्हा परिषद हे असून तालुका अध्यक्ष अनंतराव व्यास 9423342943 जलसिंचन विभाग आणि सचिव कोषाध्यक्ष म्हणून प्रभाकर चोराखळीकर ( 9420841127) सार्वजनिक बांधकाम विभाग हे कार्यरत आहेत.