परंडा (प्रतिनिधी)- परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रमेश क्षिरसागर यांनी गहाळ झालेल्या एका महिलाचे साडे सात तोळे सोण्याच्या पर्सचा सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे आठ दिवसाच्या आत तपास करून सबंधीत दागिन्यांसह पर्स मुळ मालकाच्या ताब्यात देऊन वर्दित ही माणुसकी असल्याचे दाखवून दिल्याबद्दल क्षिरसागर यांचा परंडा राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पार्टी च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे , जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे,राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष खय्यूम तुटके, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणीभाई हावरे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुका सरचिटणीस शंतनु जाधव , वस्ताद राहुल राऊत , पत्रकार भरत ननवरे, पत्रकार संतोष शिंदे ,मोरया ग्राफिक्सचे कृष्णा नरूटे आदी उपस्थित होते.