उमरगा (प्रतिनिधी)- एकुरगावाडी येथे व्यंकट धोंडीराम पाटिल यांचा सेवानिवृत्ती व 60 वा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या क्रार्यक्रमासाठी सामाजिक वन विभागाचे एन.एस पचरंडे अधिकारी, बी.पी.मुदाळ ेवनपाल अधिकारी. एस.डी.माळी , काका मगर, राहुल कलशेट्टी, विष्णु कातकडे व माळी अधिकारी अहमदपूर हे पण उपस्थित होत. या कार्यक्रमासाठी बाबळसूर,वागदरी ,एकुरगा ,जकेकुर,कडदोरा आणि एकुरगावाडी तील ग्रामस्थ, पुरुष व महिला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजर होते. येथील हरीदास जाधव, ज्योतीराम औरादे, शिवाजी मोरे, अनिल जाधव, दिलीप पाटील, विजय जाधव, राम सोलगे, किशोर मोरे, विजयकुमार पाटील, वैजनाथ ज्योगदांडे, काशिनाथ माने, विनोद जाधव, प्रताप औरादे, गावातील नागरीक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या क्रार्यक्रमासाठी  सुत्रसंचालन अनिल जाधव यांनी केले. 

 
Top