परंडा (प्रतिनिधी)- इनगोदा तालुका परंडा येथील असलेली व शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ.गजेंद्र रंदिल यांची द्वितीय कन्या श्वेता गजेंद्र रंदिल हिने नुकतीच आरोग्य विद्यापीठ नाशिक अंतर्गत असलेले लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल सायन मुंबई येथे प्रथम क्रमांकाने एम डी पदवी संपादन केली.

श्वेता गजेंद्र रंदिल हिने प्राथमिक शिक्षण रावसाहेब पाटील विद्यालय परंडा येथे पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण कल्याण सागर माध्यमिक विद्यालय परंडा येथे व उच्च माध्यमिक शिक्षण दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर येथे पूर्ण केले. तसेच एमबीबीएस हे वैशंपायन शासकीय मेडिकल कॉलेज सोलापूर येथे पूर्ण केले आहे.व एम डी पॅथॉलॉजी लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल सायन मुंबई येथे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे. श्वेताचे  वडील डॉ.गजेंद्र हे शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयात मराठी विभागाचे प्राध्यापक तर आई गृहिणी असून मोठा भाऊ महेश गजेंद्र रंरिल हा सहशिक्षक असुन रयत शिक्षण संस्थेचे न्यु इंग्लीश स्कूल टेंबुर्णी येथे कार्यरत आहे. छोटा भाऊ अक्षय याने  इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.असा त्यांचा सुशिक्षीत परिवार असून श्वेताने स्वतःच्या कष्टाने प्रामाणिकपणे अभ्यास करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे.तिच्या यशाबद्दल श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर अध्यक्ष सुनील शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने, स्टाफ सेक्रेटरी डॉ. शहाजी चंदनशिवे प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाणे व कार्यालयीन अधिक्षक पद्मा शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करत तिचे अभिनंदन केले.


 
Top