तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील कुंभारी येथील वर्षाराणी संतोष वडणे यांची शुक्रवार दि. 30 मे रोजी झालेल्या बैठकीत सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. मराठा आरक्षण आंदोलनानंतरची कुणबी मराठाची पहिली महिला सरपंच होण्याचा कुंभारीच्या नुतनसरपंच वर्षाराणी वडणे यांना मिळाला आहे.
त्यावेळी सकल मराठा समाज शहर व तालुका, जिल्हा यांच्या वतीने आनंद व्यक्त केला. त्यांचे पोखरापूर येथील बंधू राजकुमार निवृत्ती दळवे (ग्रा. पं. सदस्य पोखरापुर) तसेच ॲड. श्रीरंग लाळे यांनी त्यांच्या दाखल्यासाठी विशेष प्रयत्न केलेले होते.