धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अधिक चांगली करण्याच्या उद्देशाने वरिष्ठ  पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून या बदल्यांतर्गत रितु खोकर (भा.पो.से.) यांची धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाले बद्दल बुधवार दि.28 रोजी सकाळी 11:30 वाजता मराठा समाज मोफत वधु-वर सूचक समिती धाराशिवच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पोलीस अधिक्षक रितु खोकर यापूर्वी सांगली येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या.धाराशिवचे विद्यमान पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची या बदल्यांमध्ये बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी आता रितु खोकर या जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेची धुरा सांभाळणार आहेत. धाराशिव जिल्ह्यासाठी रितु खोकर यांची नियुक्ती हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

नवीन पोलीस अधीक्षक रितु खोकर यांच्याकडून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याची अपेक्षा उपस्थित सकल मराठा समाज मोफत वधु -वर सुचक समितीमधील सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सकल मराठा समाज मोफत वधु -वर समितीतील प्रा.अभिमान हंगरगेकर,अशोक गायकवाड,अशोक चव्हाण,गोरोबा लोंढे, नवनाथ पवार,राजू तांबे,अण्णासाहेब कदम, कमलाकर मुंडे,दत्तात्रय घाडगे,संजय शिंदे,अमोल निंबाळकर,अशोक ठोंबळ, अर्जुन जाधव आदीजण उपस्थित होते.

 
Top