परंडा (प्रतिनिधी)- माध्यमिक. व ऊ. मा. विद्यालय, शेळगाव ता. परांडा जि. धाराशिव या विद्यालयातील सन -1998-99 च्या इ.10 वी च्या माजी विध्यार्थ्याचा 'स्नेहमेळावा 27 वर्षा नंतर थाटात संप्पन्न झाला.

प्रथम विध्यार्थ्यानी शाळेच्या गेट मध्ये माजी प्राचार्य संभाजी मोरे यांचे सह सर्व गुरुजणांचे टाळ्याच्या कडकडाटात गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. माजी क्रीडा शिक्षक कुटे सर यांनी मैदानावर विध्यार्थ्यांना रांगेत उभा करून उपस्थिता सह प्रर्थना घेतली व रांगेत कार्यक्रम स्थळी सर्वांचे आगमन झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थापक अध्यक्ष ॲड.सुभाषराव मोरे यांनी भूषवले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रम सुरु करण्यात आला.माजी विध्यार्थी डॉ.लहू शेवाळे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन करत कार्यक्रम पार पाडला.माजी विध्यार्थी विध्यार्थिनीच्या हस्ते सर्व आजी - माजी शिक्षकांचा सत्कार  पुष्पगुछय व मानचिंन्ह देऊन करण्यात आला. त्याच बरोबर अनेक विध्यार्थी विध्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेचे व शिक्षकांनचे ऋण व्यक्त केले.अनेक वर्ष्या नंतर सर्व मित्र मैत्रिणींना भेटल्याचा आनंद हि व्यक्त केला.तर कांही कविता व शालेय आठवणीतून टाळ्या मिळवल्या.हलक्या फुलक्या विनोदाने हसत खेळत कार्यक्रम रंगला.व दिवसभर स्वछंद आनंदाची उधळण केली.

प्राचार्य  कुमटकर सर यांनी भूमितीचा जीवनासी संबंध जोडत मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले व टाळ्या मिळवल्या तर विजय परदेशी सर यांनी शिष्याने गुरूला दिलेले हे मानचिन्ह आमच्यासाठी जागतिक पुरस्कारा पेक्षाही लाख मोलाचे आहे. आम्ही तुमच्या रूपात स्वतःला पाहतो असे मत व्यक्त केले.माजी प्राचार्य काळे जी.डी.सरांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडतच जुन्या आठवणी सांगताना सर्व विध्यार्थ्यांचा शाळेला अभिमान आहे म्हणत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 सुभाषराव मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्वांचे कौतुक करत शाळेवर असेच प्रेम ठेवा अशी ईच्छा व्यक्त केली व सर्व विध्यार्थ्यांना भावी आयुष्या साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. ज्या माजी विध्यार्थी -विध्यार्थिनींनी या जगाचा निरोप घेतला त्यांना सर्वांनी श्रद्धांजली समर्पित केली.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी विध्यार्थी दिगंबर शेवाळे यांनी केले व स्नेहभोजना नंतर कार्यक्रम समाप्त करण्यात आला.

 
Top