ताज्या घडामोडी



तुळजापूर  (प्रतिनिधी)- येथील पंचरंग प्रतिष्ठान, तुळजापूर आयोजित व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप दि. 24 मे रोजी करण्यात आला. या शिबीराचा पंचाहत्तर मुलामुलींनी लाभ घेतला. दिनांक 21 मे ते 24 मे 2025  या दरम्यान शिबिर संपन्न झाले. 

या शिबिरात इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गातील मुला -मुलींनीसाठी हे शिबिर घेण्यात आले. या मध्ये एकूण पंच्चाहात्तर मुला - मुलींनी सहभाग नोंदविला होता. या शिबिराला मुख्य मार्गदर्शक  तुषार भद्रे, सिनेनाट्य अभिनेता संदीप पाठक, प्रा. डॉ.संजय पाटील - देवळाणकर, प्रा. डॉ. अनिरुद्ध खुटवड यांचे मार्गदर्शन लाभले.  शिबिर समारोप प्रसंगी मुख्य मार्गदर्शक तुषार भद्रे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, मुले समोर येऊन आपले मनोगत मोठ्या विश्वासपूर्णरित्या  मांडत आहेत. हिच या शिबिराची पावती आहे. असा समारोप होणे म्हणजे खूप मोठी आणि आनंददायी गोष्ट आहे. प्रा. संभाजी भोसले यांनी सर्व शिबिरार्थी आणि पालकांचे पंचरंग प्रतिष्ठान यांच्यावर विश्वास दाखवून आपली मुले या शिबिरात पाठवली त्या बद्दल सर्व पालकांचे आभार व्यक्त केले. आणि शिबिरार्थी ना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सर्व समन्वयक यांचे आणि आयोजकाचे अभिनंदन केले.

 
Top