कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिनांक 06 जून 2025 वार शुक्रवार रोजी सकाळी 11.00वाजता अभिवादन करण्यात आले.

06जून 1674 या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले. रायगडावर झालेला न भूतो न भविष्यति असा ‌‘शिवराज्याभिषेक सोहळा' महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड हिंदुस्थानातील इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. दरवर्षीप्रमाणे यंदाही तारखेनुसार 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. यंदा राज्याभिषेकाचे 351 वे वर्ष पूर्ण होत आहे.या वेळी उपप्राचार्य डॉ कमलाकर जाधव, अधीक्षक हनुमंत जाधव,प्रा. महेश मडके, प्रा. संदीप देवकते, अरुण मुंढे, संतोष मोरे, विनोद खरात, भास्कर बोराडे, अमोल सुरवसे,कालिदास सावंत, बालाजी डिकले, उमेश साळुंखे, आदित्य मडके,आदी शिक्षक आणि शिक्षेकत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top