धाराशिव (प्रतिनिधी)- बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे हे आज जिल्हयाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले. मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मंत्री राणे यांचा मंदिर संस्थानच्या वतीने मंदिर संस्थानचे व्यवस्थापक (प्रशासन) तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी पुष्पगुच्छाने स्वागत करून कवड्यांची माळ आणि श्री तुळजाभवानी देवीजींची प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी अध्यक्ष नितीन काळे, गुलचंद व्यवहारे, विनोद गपाट आदी उपस्थित होते.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top