भूम (प्रतिनिधी)- सार्वजनिक आरोग्य विभाग धाराशिव ग्रामीण रुग्णालय भूम व शिवसेना वैद्यकीय कक्ष धाराशिव यांच्या संयुक्त वतीने ग्रामीण रुग्णालय भूम येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 352 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख पांडुरंग धस यांच्या हस्ते व वैद्यकीय अधीक्षक डॉ सुजित नाईकल यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून औक्षण व पूजन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
शिवसेना सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्यामार्फत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रुग्णांना फळे व मिठाई वाटप करण्यात आली.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.खराडे, दंत रोग तज्ञ डॉ.अमोल कुटे, आदर्श शिंदे, समुपदेशक सूर्यकांत तटाळे, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.