धाराशिव (प्रतिनिधी)- भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धाराशिव येथे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी हा कार्यक्रम पार पडला.

आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात व्याख्याते संतोष चव्हाण,जिल्हा रोजगार,स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त संजय गुरव,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण औताडे,भाई उद्धवराव पाटील युथ फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुलभा पाटील,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय देशमाने, नायब तहसिलदार महादेव शिंदे, व्यापारी महासंघाचे महेश वडगावकर आणि संगीत तज्ञ सचिन केंगार यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य व्याख्यानात संतोष चव्हाण यांनी “नागरिकांचे कर्तव्य व शिष्टाचार“ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यालय अधीक्षक विजयकुमार धनशेट्टी, गटनिदेशक फतेसिंह जगताप,तसेच प्रकाश गाडेकर, सखाराम राऊत, धनश्री हिंदाने, कल्याणी भोसले व विद्या भोसले यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण झरकर यांनी तर आभार प्रदर्शन पुनम जेऊघाले यांनी केले.

 
Top