धाराशिव (प्रतिनिधी)- जवाहर नवोदय विद्यालय तुळजापुर येथे चालु असलेल्या वार्षिक कँपमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागातील कॅडेट भूमिका शेंडगे हिने दिल्ली येथे पार पडलेल्या शुटिंग स्पर्धेत भारतातुन तृतीय क्रमांक येण्याचा बहुमान प्राप्त केला होता. तसेच कॅडेट प्रमोद सुनगार महाराष्ट्रातुन शुटिंग मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. त्याबदल भूमिका व प्रमोद या दोघांचा सत्कार छत्रपती संभाजीनगरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर ए. जी. बारबरे यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
ब्रिगेडिअर बारबरे यांनी यावेळी कॅडेटसना मार्गदर्शन करताना युवकांमध्ये एनसीसीची स्थापना ज्या उदेश्याने केली आहे ते म्हणजे युवकांमध्ये अनुशासन,नेतृत्व,शिस्त,अथक परिश्रम,आत्मविश्वास याचे पालन करून देशाची, समाजाची सेवा करावी असे आव्हान त्यांनी यावेळी केले. एनसीसीची बी व सी प्रमाणपत्र परीक्षा पास होणाऱ्या कॅडेटसना एसएसबी, सीडीएस परीक्षा देऊन सरळ अधिकारी होण्याची तयारी करावी. या कार्यक्रमासाठी लातूर बटालिअनचे कमान अधिकारी कर्नल संतोष नवगण, कर्नल वाय बी सिंग, सुभेदार कमल सिंग, मुले, मुली कॅडेटस, पीआय स्टाफ कर्मचारी, शिक्षक,प्राध्यापक उपस्थित होते.या यशाबदल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे,उपाध्यक्ष अश्लेष मोरे सर्व संचालक मंडळ,प्राचार्य डॉ संजय अस्वले कॅप्टन,डॉ विनोद देवरकर,डॉ पदमाकर पिटले,कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले,राजकुमार सोनवणे,नितीन कोराळे व सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका,कर्मच्याऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
