धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव सर्कल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना लि. अरविंदनगर, केशेगाव येथे दीपावली 2026 निमित्त सभासद, लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटपाचा शुभारंभ अभिलाष लोमटे, सहकार परिषद अध्यक्ष राजाभाऊ पवार नगरसेवक, धाराशिव अग्निवेश शिंदे , धाराशिव यांच्या हस्ते साखर पोते पुजन करून करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अरविंद गोरे, संचालक ॲड.निलेश आणा बारखडे, विश्वस्त जयंत शिंदे, ययाती देशमुख, यशवंत शिंदे तसेच माजी संचालक मते, सदाशिव आपा कोळगे उपस्थित होते. कारखाना कर्मचारी गायकवाड व्हि .के., कदम बी आर, पडवळ एस व्ही, वार ए एस उपस्थित होते.
