धाराशिव (प्रतिनिधी)- परिवहनमंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे सोमवार,2 नोव्हेंबर 2026 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते तामलवाडी,येणेगूर आणि उत्तर जेवळी येथे आयोजित दिवाळी शुभेच्छा वाटप कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून,श्री तुळजाभवानी देवीचे दर्शनही घेणार आहेत.
पालकमंत्री सरनाईक हे दौरा कार्यक्रमानुसार,दुपारी 12.15 वाजता पुरंदर (सासवड) येथून मोटारीने ते तामलवाडी,ता.तुळजापूर, जि.धाराशिवकडे मोटारीने प्रयाण करतील.सासवड - फलटण - पंढरपूर- सोलापूर-तामलवाडी या मार्गाने ते सायंकाळी 5 वाजता तामलवाडी, ता.तुळजापूर येथे आगमन व आयोजित दिवाळी शुभेच्छा वाटप कार्यक्रमास ते उपस्थित राहतील.त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता तामलवाडी येथून मोटारीने येणेगूर,ता.उमरगाकडे प्रयाण करतील.
सायंकाळी 6.30 वाजता येणेगूर येथे आगमन होणार असून,तेथील दिवाळी शुभेच्छा वाटप कार्यक्रमास ते उपस्थित राहतील.सायंकाळी 7 वाजता येणेगूर येथून मोटारीने लोहारा तालुक्यातील उत्तर जेवळीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 7.30 वाजता उत्तर जेवळी येथे आगमन झाल्यानंतर तेथील दिवाळी शुभेच्छा वाटप कार्यक्रमास पालकमंत्री सरनाईक उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रात्री 8.30 वाजता उत्तर जेवळी येथून मोटारीने श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूरकडे प्रयाण करतील.रात्री 9.30 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर येथे त्यांचे आगमन होणार असून,श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतील.दर्शनानंतर सोयीनुसार श्री तुळजाभवानी मंदिर येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह,तुळजापूरकडे प्रयाण,शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथे आगमन व मुक्काम करतील.
