मतदान प्रक्रिया संपेपर्यंतच मद्यविक्रीवर धाराशिव (प्रतिनिधी)- औरंगाबाद विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात केवळ मतदानाच्या दिवशी,म्हणजेच २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंतच मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.यापूर्वीच्या आदेशातील २१ व २२ ऑक्टोबर हे दिवस 'कोरडा दिवस' म्हणून वगळण्यात आले असून,या दोन्ही दिवशी जिल्ह्यातील मद्यविक्री दुकानांवरील व्यवहार नियमितपणे सुरू राहणार आहेत.औरंगाबाद विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी,तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मद्यविक्रीबाबत सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.सुधारित आदेशानुसार २१ ऑक्टोबर २०२६ आणि २२ ऑक्टोबर २०२६ हे दोन्ही दिवस कोरडा दिवसाच्या आदेशातून वगळण्यात आले आहेत.त्यामुळे या दोन्ही दिवशी जिल्ह्यातील मद्यविक्री दुकानांवरील व्यवहार सुरू राहतील.मात्र,मतदानाच्या दिवशी २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवणे बंधनकारक राहणार आहे.जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या सुधारित आदेशाची सर्व संबंधित मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आदेशाच्या पालनात कोणत्याही प्रकारची कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा,१९४९ चे कलम ५४ व ५६ मधील तरतुदींनुसार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अनुज्ञप्तीधारकांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल,असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.मतदानाच्या दिवशी लागू करण्यात आलेल्या मद्यविक्री बंदीच्या आदेशाचे सर्व संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी काटेकोर पालन करावे.तसेच २१ व २२ ऑक्टोबर रोजी मद्यविक्रीचे व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी असून,केवळ २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंतच कोरडा दिवस लागू राहणार असल्याची नोंद घ्यावी,असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. October 21, 2026 A+ A- Print Email