धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत स्कूल ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बारामती येथे आयोजित आंतर विभागीय जलतरण स्पर्धा 2026-27 मध्ये तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धाराशिवची विद्यार्थिनी श्रावणी पांडुरंग रणखांब हिने दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

गतवर्षी ही हिने अशीच उत्कृष्ट कामगिरी केली होती. सातत्याने  चांगली अशीच कामगिरी होण्यासाठी श्रावणी सतत नियमितपणे सराव करत आहे. त्याचबरोबर अभियांत्रिकी सारखेही टेकनिकल शिक्षण चांगल्या पद्धतीने घेत आहे. श्रावणीने 50 मीटर फ्री स्टाईल आणि 100 मीटर फ्री स्टाईल या दोन्ही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.तिच्या आई वडिलांनी प्रत्येक स्पर्धेला श्रावणीला वेळो वेळी प्रोत्साहन दिले.अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. आर.एम शेख व प्रा.ए. आय. काझी यांचे तिला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, महाराष्ट्र शासनाच्या ‌‘मित्रा' संस्थेचे उपाध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील आणि संस्थेचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 


 
Top