तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीची पंढरपूर येथे आज नगर प्रदक्षिणा संपन्न झाली.प्रचंड मोठ्या संख्येने भाविक भक्त यामध्ये सहभागी झाले होते.
तेर येथील श्री संत गोरोबा काका यांची पालखी पंढरपूरला कार्तिक सोहळ्यासाठी भाऊबीजेच्या दिवशी 11नोव्हेबरला मार्गस्थ झाली.पालखी हिंगळजवाडी,वरूडा, धाराशिव,भातंबरे,वैराग,यावली,खैराव,अनगर,रोपळे येथे मुक्काम करून 20 नोव्हेंबरला पंढरपूरला श्री संत गोरोबा काका यांच्या मठात पोंहचली.21 नोव्हेंबरला कार्तिक महीन्यातील भागवत एकादशीमुळे श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीची पंढरपूर येथे नगर प्रदक्षिणा संपन्न झाली.यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते.
