उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील आरोग्य नगरी परिसरात डॉ.जोशी'ज इम्लांट ॲन्ड डिजीटल डेंटिस्ट्र या नुतन इमारत वहॉस्पिटलचे उद्घाटन हैद्राबाद येथील प्रसिद्ध सर्जन डॉ. दिनेश शर्मा व सुविद्य पत्नी शर्मा यांच्या हस्ते मोठ्या उत्साहीत वातावरणात दि. 22 रोजी सकाळी 11:30 वाजता डॉ. प्रतिक जोशी, डॉ. स्वप्नजा या दांपत्याचे कुळदैवत श्री. व्यंकटेश देवाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. 

 यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष धाराशिव अचे माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, नगराध्यक्ष किरण गायकवाड, अनंतराव जोशी, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, उमरगा पंचायत समितीच्या सभापती ॲड. आकांक्षा चौगुले, माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, डॉ. प्रतिक जोशी, डॉ. स्वप्नजा जोशी, डॉ. मल्लीनाथ मलंग, अभियंता संजय सरपे, डॉ. सचिन शेंडगे, डॉ. विजय बेडदुर्गे, डॉ. राजकुमार कानडे, डॉ. विजय गायकवाड, डॉ. सुरेश चव्हाण, शिक्षक गोपाळ आष्टे, नगरसेवक विशाल कानेकर,

रत्नाकर सगर, नगरसेवीका आरती शिंदे, नगरसेवीका सुप्रिया घोडके, आर्कीटेक्चर भंडारी, नगरसेवक सचिन जाधव, शफी चौधरी, शिवसेनेचे युवक तालुकाध्यक्ष शरद पवार, शहराध्यक्ष योगेश तपसाळे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कोथळीकर यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ.प्रतिक जोशी, डॉ.स्वप्नजा जोशी यांनी केले.तर अध्यक्षीय समारोप माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार संजय कोथळीकर यांनी मानले. यावेळी शहरातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 
Top