तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे पंढरपूरला 20 नोव्हेंबरला प्रात:काली आगमन झाले.यावेळी चंद्रभागा नदीच्या पाण्याने श्री संत गोरोबा काका यांच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.

तेर येथील श्री संत गोरोबा काका यांची पालखी तेरहून पंढरपूरला भाऊबीजेच्या दिवशी मार्गस्थ झाली.20 नोव्हेंबरला श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे पंढरपूरला प्रात:काली चंद्रभागा नदीच्या तिरावर आली.त्याठिकाणी श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीतील पादुकाला चंद्रभागा नदीच्या पाण्याने स्नान घालण्यात आले.यानंतर श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे पंढरपूर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मठामध्ये आगमन झाले.पंढरपूरला पालखीचे आगमन होताच भाविकभक्त यांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.


 
Top