धाराशिव (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकरी बांधवांच्या नुकसान भरपाईसाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी बांधवांची बाजू मान्य केल्याची बातमी समजताच धाराशिव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव एकत्र आले. यावेळी एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकरी बांधवांच्या न्यायालयीन लढ्याला मिळालेले हे यश महत्त्वपूर्ण ठरले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना या निर्णयामुळे बळ मिळाले आहे. मात्र, पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम प्रत्यक्ष जमा होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
