मुरूम (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थ कामगिरी केल्याबद्दल, उमरगा तालुक्यातील मुरूम येथील सामाजिक कार्यकर्त्या रूपालीताई शिवाजीराव शिंदे यांना राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित 'गरुड झेप सामाजिक पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. पंढरपूर येथील सिंहगड इन्स्टिट्यूट सभागृहात पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या विशेष सोहळ्यात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, गौरवपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

रूपालीताई शिंदे या गेल्या अनेक वर्षांपासून मुरूम, उमरगा परिसर तसेच संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. अत्यंत सामान्य कुटुंबातीलतून संघर्ष करत सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देऊन त्यांनी आपले सामाजिक भान जपले आहे. समाजातील वंचित, गरीब, अनाथ आणि संकटग्रस्त घटकांना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात किंवा वैयक्तिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी ते सातत्याने अग्रेसर असतात.

त्यांच्या याच निस्वार्थ आणि अविरत लोकसेवेची दखल घेऊन त्यांना या राष्ट्रीय सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण रूपालीताई  शिंदे यांना मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव नसून, ग्रामीण भागात प्रामाणिकपणे झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान असल्याची भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या यशाबद्दल मुरूम शहरासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, परिसरातील महिला व तरुण पिढीला यामुळे मोठी सामाजिक प्रेरणा मिळणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल राजकीय, सामाजिक, प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून रूपालीताई  शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

 
Top