अतनुर (प्रतिनिधी)- शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक शुध्द पौर्णिमेच्या निमित्त श्री क्षेत्र कपिलधार, ता. जि. बीड येथे होणाऱ्या यात्रेमध्ये 'शासकीय महापुजा' व 'भव्य राज्यव्यापी वार्षिक मेळावा' आयोजित केला जातो. श्री क्षेत्र कपिलधार येथे शिवा संघटनेच्या प्रथेप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार दिले जातात. त्यामुळे यंदाही दि. 24 नोव्हेंबर 2026 मंगळवारी 31 व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन केले असुन या मेळाव्याच्या निमित्ताने शिवा संघटनेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील वीरशैव - लिंगायत समाजाच्या मान्यवरांना 'शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्कार' जाहिर करुन, सन्मान चिन्ह व सन्मान पत्रासह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देवुन श्री क्षेत्र कपिलधार येथे यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. देशातील वीरशैव - लिंगायत समाजात अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या शिवा संघटनेच्या या राष्ट्रीय भुषण पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड 'शिवा' संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर यांनी नुकतीच जाहिर केली आहे. त्यात अतनुर ता.जळकोट येथील समाजभुषण माजी सैनिक अरविंद सासट्टे यांना जाहिर झाला असुन ते देश सेवा ते समाज सेवा... एक अविरत प्रेरणादायी प्रवास!
अत्यंत अभिमानास्पद बाब! 19 वर्षे भारतीय सैन्यात देश सेवेमध्ये कर्तव्य बजावून, मातृभूमीचे रक्षण केल्यानंतर, तितक्याच तडफेने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वतःला झोकून देणारे आमचे मार्गदर्शक, मित्र अरविंदजी सासटे यांना 'शिवा राष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्कार' मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 19 वर्षे अखंड देश सेवा केली तसेच तळागाळातील लोकांसाठी सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देत आहेत. त्यांचे लोकाभिमुख राजकीय कार्यातही त्यांचा सहभाग महत्वाचा आहे. या कार्याची दखल घेऊन हा सन्मान आम्हा सर्व मित्र परिवाराची अतनुर गावाची मान अभिमानाने उंचावणारा आहे. सैन्यातील शिस्त आणि समाजाप्रती असलेली निष्ठा या दोन्हीचा संगम त्यांच्या कार्यातून दिसतो. या सर्वोच्च बहुमानाबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि पुढील सामाजिक-राजकीय वाटचालीस मित्र परिवाराकडून व समाजाकडुन अनंत शुभेच्छा!
तसेच दुसरे समाजभुषण रवी कल्पे हे शिवा संघटनेचे कुशल संघटक व मार्गदर्शक म्हणुन कार्य करत आहेत.दर सोमवारी शिवपाठ, महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या स्मारकाची आरती, आतनुर ते कपीलाधार महापदयाञेचे आयोजन व नियोजन, मासिक शिव रात्री व ग्रंथराज परमरहस्य पारायण, सर्व धर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जन्मोत्सव समाधी सोहळा य़ाचे विशेष कार्यक्रम आयोजित करतात.जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचे विचार समाजामधे रुजविण्याचेही काम ते आपल्या कार्यातुन सतत करत असतात.या कार्याची दखल घेऊन त्यांनाही शिवा राष्र्टीय पुरस्कार जाहिर झाला असुन अतनुर परिसरांत गांवक-याकडुन अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसतो आहे. अशा प्रकारे “शिवा राष्ट्रीय भुषण पुरस्कार“ शनिवार 31 ऑक्टोबर 2026 ला घोषित करण्यात आले असुन या पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार मंगळवार 24 नोव्हेंबर 2026 श्री क्षेत्र कपिलधार ता. जि. बीड येथे शिवा संघटनेच्या होणाऱ्या 31 व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्यात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व शाल - श्रीफळ देवून शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे व अनेक गुरुवर्य आणि पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा पवार, ना. पंकजा मुंडे, ना. अतुल सावे, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, माजी विरोधी पक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अभयराव कल्लावार नागपूर व राष्ट्रीय सरचिटणीस श्री. उमाकांतआप्पा शेटे पुणे यांनी दिली आहे.

