धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत धाराशिव शहरातील अनेक युवकांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. 

यावेळी पक्षात प्रवेश केलेल्या युवकांमध्ये गणेश भैया घोणे, दर्शन घोणे, प्रतीक शिंदे, सुनील आदमाने, साहिल मुलाणी, संस्कार शिरसागर, साहिल पाटील, प्रशांत रखने, आदित्य लोखंडे, कृष्णा शिरसागर, ऋषिकेश लवटे, निखिल सारोळकर, वरुण बन्सोडे, किरण मगर, समर्थ लवटे, विवेक चिवरे, संकेत जवळे, ओमराज जगताप, शिवम इंगळे, ओम शाहणे, तन्मय कांबळे, श्रीकांत कुलकर्णी, अभय गराड, वैभव शाहणे, बिरांना घोडके, ओंकार पाटील, धीरज गरड आणि अथर कुरेशी यांचा समावेश आहे.

या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी सोमनाथ गुरव, नितीन शेरखाने, रामेश्वर मगर, सह्याद्री राजेनिंबाळकर, अक्षय खळदकर, आदित्य हंबीरे, अमोल निकम, शंकर सूर्यवंशी, मालोजी सूर्यवंशी, गफूर शेख, प्रसाद राजेनिंबाळकर आणि हर्षद ठवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. धाराशिव शहरातील युवकांचा शिवसेनेप्रती वाढता विश्वास आणि पक्षसंघटनेत सहभागी होण्याचा उत्साह यामुळे शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होत आहे. युवकांच्या सहभागातून आगामी काळात सामाजिक आणि सार्वजनिक कार्याला निश्चितच नवी ऊर्जा मिळणार आहे. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शिवसेना परिवारात नव्याने सहभागी झालेल्या सर्व युवकांचे स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 


 
Top