धाराशिव (प्रतिनिधी)- त्रैलोक्याचे स्वामी, भगवान परमात्मा श्री गुरुदेव दत्तात्रेय यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गुरुचरित्र पारायण, भजन, कीर्तन, पालखी मिरवणूक, महाप्रसादसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने धाराशिव येथे गुरुवार, दि. 17 ते बुधवार, दि. 23 डिसेंबर दरम्यान हा सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे.

धाराशिव शहरातील सद्गुरु कॉलनी येथे पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याची यंदा तपपुर्ती अर्थात 12 वे वर्ष आहे. गुरुवार, दि.17 डिसेंबर रोजी तिर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवस्थानचे महंत तुकोजी बाबा यांच्या उपस्थितीत होणार आहे. या जन्मोत्सव सोहळा व गुरूचरित्र पारायण सोहळ्यात दररोज दुपारी 1 ते 5 या वेळेत तसेच सायंकाळी 7 ते 10 या वेळेत भजनसेवा आयोजित करण्यात आली आहे. धाराशिव शहरातील विविध भजनी मंडळे आणि नामवंत कीर्तनकार या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. सप्ताहाच्या सांगता सोहळयाच्या निमित्ताने बुधवारी (दि. 23 डिसेंबर)हभप रघुनंदन पुजारी महाराज(श्री संत गोरोबा काका वारकरी शिक्षण संस्था तेर) यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी सकाळी 7 वाजता महाभिषेक, 8 वाजता श्री दत्तगुरूंची पालखी मिरवणूक, सकाळी 10 वाजता काल्याचे कीर्तन आणि दुपारी 1.30 वाजता महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात दि. 17 डिसेंबर रोजी संत मुक्ताई भजनी मंडळ, गांधीनगर आणि मृदंगाचार्य हभप जालिंदर (बाप्पा) सस्ते, येडशी यांची भजनसेवा होणार आहे. दि. 18 डिसेंबर रोजी लक्ष्मीनारायण भजनी मंडळ, भवानी चौक आणि गायनाचार्य श्रीकांत शिंदे महाराज, समाधान निचळ महाराज यांची भजन सेवा होईल. दि. 19 डिसेंबर रोजी गाथा भजनी मंडळ, रेल्वे स्टेशन रोड आणि गायनाचार्य हभप योगेश (बाप्पा) इंगळे महाराज व सहकारी यांच्या सहभागाने भजन सेवा होईल. दि.20 डिसेंबर रोजी संत जनाबाई भजनी मंडळ, शांतिनिकेतन कॉलनी आणि शोभन भजनी मंडळ, सदगुरू कॉलनी यांची भजनसेवा होणार आहे. दि. 21 डिसेंबर रोजी रुक्मिणी भजनी मंडळ, बँक कॉलनी आणि जय संतोषीमाता भजनी मंडळ, समतानगर यांचा भजन सेवेत सहभाग राहणार आहे. तर, दि. 22 डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ, गणेशनगर आणि भजनसम्राट शिवकुमार मोहेकर व सहकारी यांची भजनसेवा होणार आहे. या धार्मिक सोहळ्याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय रणदिवे व सदगुरू कॉलनीतील भाविक-भक्तांनी केले आहे. 


 
Top