तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जे युवक  लढत आहेत त्यांना  हिटलरशाही केंद्र सरकार  जेलमध्ये टाकत आहेत. केंद्र शासनाने या देशातील सर्व यंत्रणा आपल्या ताब्यात घेऊन लोकशाही आणि संविधान संपवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे असा आरोप करून केंद्र सरकारचा हा डाव  हाणून पाडण्यासाठी आणि त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी 1 नोव्हेंबरला तेर येथे नागरीकांनी एकत्र येऊन  तीव्र निषेध व्यक्त केला. हातात तिरंगा झेंडा घेऊन नागरीकानी केंद्र सरकारचा निषेध केला.यावेळी कानिफनाथ देवकुळे, तानाजी पिंपळे, सचिन देवकते, शिवाजी चौगुले, अविनाश आगाशे,चंद्रकांत माळी,अनसार मासुलदार,अमोल कसबे, अविनाश इंगळे, विनोद कांबळे,दत्ता कांबळे, धनंजय आंधळे, किरण थोडसरे,हिज्जू काझी आदी उपस्थित होते.

 
Top