धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब पोलीस ठाणे :दि.07.10.2026 रोजी 14.30ते 18.00 वा. सुमानधने पेट्रोल पंपाचे समोरील शेतात हासेगाव शिवार येथे मयत नामे- कोमल गणेश उर्फ विनायक शिवाजी टेकाळे, रा. पुर्नवसन  सावरगाव ता. कळंब जि. धाराशिव यांना आरोपी नामे- गणेश उर्फ विनायक शिवाजी टेकाळे, रा. पुर्नवसन सावरगाव ता. कळंब जि. धाराशिव याने चारित्र्यावर संशय घेवून चैन व दगडाने डोक्यात मारहाण करुन जिवे ठार मारले होते. अशा मजकुराच्या फिर्यादीनामे-बंडु विश्वांभर पवार, वय 51 वर्षे, रा. करंजकल्ला ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.08.10.2026 रोजी दिलेल्या प्रथमखबरे वरुन पो. ठाणे कळंब गुन्हा रजिस्टर नंबर 434/2026 येथे भा.न्या.सं.कलम 103(1) अन्वये गुन्हा नोंदवलाआहे.

सदर गुन्ह्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत असताना आरोपीचा त्याच्या गावी ठावठिकाणा लागत नसल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. आरोपीत वेळोवेळी आपले वास्तव्य बदलत असल्याने पोलीसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील आरोपी गणेश उर्फ विनायक शिवाजी टेकाळे, रा. पुर्नवसन सावरगाव ता. कळंब जि. धाराशिव यास पुर्नवसन सावरगाव शिवारातील शेतातील गोठ्यातुन ताब्यात घेवून त्याचे कडे नमुद गुन्ह्या बाबत विचार पुस केली असता त्याने  सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास कळंब पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान बजबळकर यांच्या सह पोलीस अंमलदार, पोलीस कॉन्स्टेबल अनिल भोसले, पोलीस कॉन्स्टेबल किरण माळी, पोलीस कॉन्स्टेबल औदुंबर गजबार व पोलीस कॉन्स्टेबल सुनील तारळकर यांचे पथकाने केली आहे.


 
Top