धाराशिव (प्रतिनिधी)- एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि., जागजी कारखान्याने चालू तृतीय गळीत हंगाम 2026-27 मध्ये कारखान्याने गाळपासाठी आलेल्या ऊसाचे बिल वेळेत अदा करण्यावर भर दिला आहे. तिसऱ्या पंधरवाड्यात 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या 17 हजार 731 मेट्रिक टन ऊसाचे प्रतिटन 3,100 रुपये दराने एकूण 5 कोटी 49 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत वर्ग करण्यात आले आहेत.
गळीत हंगाम सुरू झाल्यापासून दुष्काळी परस्थितीत एन. व्ही पी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे वेळेवर उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे दिवाळी पूर्वी गाळपास आलेल्या ऊस बिल पोटी 10 कोटी 9 लाख रुपये शेतकऱ्यांच्या घरात पोहचवण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिवाळी सण आनंदाचे साजरा करण्यात मदत होणार आहे. एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि. जागजी कारखान्याने शेतकऱ्यांचे हित सर्वोच्चस्थानी ठेवून चाचणी गळीत हंगामापासूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अवघ्या पंधरा दिवसांत ऊसाचे बिल अदा करण्याची परंपरा सुरू केली आहे. एन.व्ही.पी. शुगर परिवाराने सुरू केलेली ही परंपरा चालू गळीत हंगामातही कायम ठेवली असून, वेळेत ऊस बिल मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नियोजनासाठी मदत होत आहे.
दरम्यान, ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या बँक खात्याशी संबंधित कागदपत्रे कारखान्याकडे जमा केलेली नाहीत, त्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.,धाराशिव येथील बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत कारखाना साईटवर जमा करावी, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बालाजी पाटील यांनी केले आहे.
