धाराशिव (प्रतिनिधी)- दुष्काळाचे संकट आणखी गडद झाले आहे. शेतकरी चहू बाजूंनी अडचणीत सापडला असून पशुधन जगवण्याचे अतिरिक्त संकट समोर दिसत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या वतीने चारा छावण्या सुरु करण्यात येणार. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत त्या छावण्या सुरू करण्यात येतील. संवेदनशील पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व शिवसैनिकांना त्यात सहभागी होऊन सेवा करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांसोबत मंत्रालय मुंबई येथे सरनाईक यांच्या दालनात त्या अनुषंगाने मंगळवारी बैठक देखील पार पडली. अशी माहिती योगेश केदार यांनी दिली.
सरकारी चारा छावण्या सुरू करण्याचा शासन निर्णय जेंव्हा होईल तेंव्हा होईल. पण शेतकरी मायबापांनी लेकरा प्रमाणे सांभाळलेली गुरे ढोरे चारा पाण्यविणा राहू नयेत यासाठी संवेदनशील पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी पुढाकार घेतला आहे. पक्षाच्या वतीने खर्च करून माय बाप शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लवकरच छावण्या साठीची जागा निश्चिती केली जाईल.
पुढचे आठ ते नऊ महिने अडचणीचे असणार आहेत. त्यामुळे अशा संकट काळात संवेदनशील पालक मंत्री प्रताप सरनाईक साहेब पुढाकार घेऊन मदत करणार आहेत. त्यांचे जिल्ह्याच्या शेतकरी बांधवांच्या वतीने जाहीर आभार मानतो
सदर बैठकीत उमरगा शहराचे नगराध्यक्ष किरण गायकवाड, माजी जिल्हाप्रमुख अजित पिंगळे, युवा नेते आनंद पाटील तसेच इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
