उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील येळी येथील वार्ड क्रमांक 01 मधे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा युवा समाजसेवक बाबा पवार यांनी स्वतःची सोन्याची अंगठी गहान ठेवून गावतील नागरिकांना  पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता विंधन विहिर (बोअरवेल) पाडून दिल्याची घटना बुधवार दि. 7 रोजी घडली आहे. 

येळी गावचे सरपंच व उपसरपंच यांचे प्रभाग क्रमांक 1 मध्ये बोर पाडण्यासाठी तीव्र विरोध असताना देखील समाजसेवक बाबा पवार यांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या पैशाने विंधन विहीर पाडली आहे. तसेच पाडलेल्या विंधन विहिरीला भरपूर प्रमाणात पाणी लागले आहे. या वेळी वार्ड क्रमांक एक चे ग्राम पंचायत सदस्य सोमेश्वर हिंडोळे, प्रशांत देढे, बाळासाहेब मोरे, तसेच अनिल पाटील, बारकू पाटील, अंकुश अगंबरे, दुष्यंत पाटील, शाम रेड्डी, लहू लिंबाळे, गणेश बनसोडे, शांतू पाटील, आदित्य बनसोडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top