मुरूम (प्रतिनिधी)- धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या 19 वर्षांखालील जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत भारत शिक्षण संस्था, उमरगा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मुरूम येथील मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे संघाची आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत महाविद्यालयाच्या कृतिका इंगोले, अफसाना कुरणे, तसलीम जमादार, तेजस्विनी खजुरे आणि साक्षी कुचगे या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे उपाध्यक्ष अश्लेष मोरे सचिव पद्माकर राव हराळकर संचालक त्रंबकराव इंगोले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद इंगोले व क्रीडा शिक्षक बालाजी इंगोले यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडूनही खेळाडूंचे कौतुक होत आहे.
