धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी अंतर्गत शिंगोली व उपळा येथील उपकेंद्रांना सरप्राईज भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला.

या भेटीदरम्यान त्यांनी उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती, एनसीडी (असंसर्गजन्य आजार), सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक उपक्रमांची अंमलबजावणी, आरोग्यविषयक रेकॉर्ड व नोंदी, लाभार्थी सेवा तसेच इतर आरोग्यविषयक बाबींची पाहणी केली. आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे व गुणवत्तापूर्ण पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक त्या सूचना डॉ. हरिदास यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. उपकेंद्र स्तरावर नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.

 
Top