परंडा (प्रतिनिधी)-  लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या शालेय विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा, जि.धाराशिवच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल चार सुवर्ण व दोन रौप्य पदकांची कमाई केली. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.

या विभागस्तरीय स्पर्धेत महाविद्यालयाच्या आरशालन शेख (इयत्ता 12 वी), अमर पाटील (इयत्ता 12 वी), ऋतुजा ओव्हाळ (इयत्ता 11 वी) आणि हर्षदा गटकुळ (इयत्ता 11 वी) यांनी आपल्या गटात दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळविले. विशेष म्हणजे ऋतुजा ओव्हाळ (4244 किलो वजनगट) आणि हर्षदा गटकुळ (42 किलो वजनगट) यांनी अंतिम फेरीतील अत्यंत चुरशीच्या लढतीत प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विभागात प्रथम क्रमांक मिळविला. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. तसेच महाविद्यालयाच्या सायली मिसाळ (इयत्ता 11 वी) आणि मंतशा मोमीन (इयत्ता 11 वी) यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदक पटकावले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ किरण देशमुख, क्रीडा विभागाचे विभाग डॉ कृष्णा परभणे, प्रशिक्षक दीपक ओव्हाळ आदींनी अभिनंदन केले आहे. 


 
Top