धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आश्रमशाळेतील शिक्षक जाधव चंद्रकांत विठ्ठलराव चिलवडीकर यांच्या 33 वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवापूर्तीचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तीन दशकांहून अधिक काळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत योगदान देणाऱ्या जाधव सरांच्या कार्याचा यावेळी मान्यवरांनी गौरव केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोल ताकभाते होते. यावेळी युवराज भोसले, विकास चव्हाण, सुकेशनी वाघमारे, ढगे शिवाजी, साहेबराव कारभारी, कुलकर्णी प्रमोद, नागनाथ पाटील, राठोड रामराव, अंगद सगर, चिलवडीचे माजी सरपंच नाना पाटील, कृषी अधिकारी जाधव व प्रा. के. वाय. जाधव उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

यावेळी रत्नाकर पाटील यांनी जाधव सरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. फेटा, शाल व नारळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. दीपक खबोले यांनी आपल्या भाषणातून जाधव सरांच्या 33 वर्षांच्या सेवेला उजाळा दिला. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर, अभियंता, वकील, शिक्षक तसेच पोलीस अधिकारी म्हणून विविध क्षेत्रांत कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी कुटुंबातून आलेल्या जाधव सरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण केले आणि धैर्य, परिश्रम व कष्टाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रा. के. वाय. जाधव, संजीवनी विद्यालय चिलवडीच्या मुख्याध्यापिका रेखा शिंदे, चिखली शाळेचे मुख्याध्यापक जाधव, कृषी अधिकारी ए.एस.पी. जाधव (धाराशिव), शिवसेना तालुका अध्यक्ष सौदागर वाघ व अण्णासाहेब चव्हाण यांनी जाधव सरांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुख्याध्यापक सतीश कुंभार, रत्नाकर पाटील, दीपक खबोले, खंडू पडवळ, कैलास शानिमे, सुधीर कांबळे, मल्लिनाथ कोंदे, प्रशांत राठोड, सचिन राठोड, विशाल राठोड, सुरेखा कांबळे, बालिका बोयने, वैशाली शितोळे, ज्योती साने, ज्योती राठोड, श्रद्धा सूर्यवंशी, वसंत भिसे, सचिन माळी तसेच आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने गुलाबहार, शाल व पुष्पगुच्छ देऊन चंद्रकांत जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top