तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील पुजारी परिवार व समस्त भजनी मंडळ तेर व पंचक्रोशी परिसर भजनी मंडळ तीर्थक्षेत्र सत्यपुरी यांच्या वतीने प्रथमच  श्री सत्यपुरी ( तेर ) पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळ्यास प्रारंभ झाला.

सत्यपुरीच्या ( तेर )  पंचक्रोशी मध्ये सकल ऋषी मुनीजन व अखिल देवता वन वृक्षवल्ली ,पक्षी, मृतीका व पाषाण खडकाच्या रूपाने राहतात व कोट्यावधी पुण्यपावन तिर्थाचा रहिवास या पंचक्रोशी मध्ये आहे अशी सत्यपुरीची अत्यंत दैदिप्यमान व पुण्यपावन त्रिभुवनैक पवित्र पंचक्रोशी आहे.श्री. संत परीक्षक संत गोरोबा काकांच्या समाधी सोहळ्याच्या प्रसंगी जे साधुसंत ,ऋषीमुनी व देवतागण, गंधर्व हे पंढरपूरहून  आले असता त्यांच्या वास्तव्यांनी ही पंचक्रोशीची  भूमी व्याप्त झाली होती. पंढरीचा पोहा आला ! सत्यपुरी पंचक्रोशीवरी  साधुजन !! तेव्हा नामदेव महाराजांनी व इतर साधू संत आणि देवदेवतांनी जी प्रदक्षिणा केली तीच ही सत्यपुरीनगरी. ( तेर )  पंचक्रोशी प्रदक्षिणा होत आहे.श्री सत्यपुरी (तेर) प्रदक्षणा सोहळ्याचा प्रारंभ गुरुवार १ ऑक्टोबरला झाला.यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top