तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथे तेरणा युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मेघदादा पाटील यांनी युवकांशी संवाद साधला.
यावेळी मेघदादा पाटील यांनी युवकांनी शेती बरोबर अर्थिक सक्षमतेसाठी जोडधंदा केला पाहिजे तसेच युवकांनी आपल्या अंगी असलेल्या कलाकौशल्याचा सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी डॉ.गुरूप्रसाद चिवटे, हनुमंत कोळपे, गोरख माळी, राहुल गायकवाड, नरहरी बडवे, रणधीर गायकवाड, विशाल पांचाळ, सतीश फंड,नवनाथ पसारे,अशिष माळी, प्रसाद राऊत, अभिजित गलांडे, अभिषेक गोरे,अक्षय कांबळे, काकासाहेब मते, गणेश उटगे,कार्तिक मेंगले व युवक उपस्थित होते.
