उमरगा (प्रतिनिधी)-  शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देणारे नसून समाजाची भावी पिढी घडविणारे मार्गदर्शक आहेत. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीतील बदल स्वीकारून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, संस्कार, कौशल्ये आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आमदार प्रवीण स्वामी यांनी केले.

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे रोटरी क्लब ऑफ उमरगाच्या वतीने तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा ‌‘नेशन बिल्डर' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, प्रमुख व्याख्याते डॉ. अनिकेत इनामदार, प्राचार्य डॉ. संजय अस्वले, रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल मदनसुरे, सचिव शिवशंकर व्हंडरे, नितीन होळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार स्वामी यांनी शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. गुणवंत व कर्तृत्ववान शिक्षकांचा सन्मान केल्याने त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळते, तसेच इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळते. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम, जबाबदार आणि संस्कारक्षम नागरिक घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ. अनिकेत इनामदार यांनी ‌‘गुरू म्हणजे काय?' याची उकल करताना श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे उदाहरण दिले.  यावेळी प्रविण चेंडके, डॉ. विक्रम आळंगेकर, कमलाकर भोसले, प्रा. युसुफ मुल्ला, प्राचार्य शिवानंद दळगडे, मुख्याध्यापक संजय ढोणे, उपप्राचार्य विनोद देवरकर, माजी प्राचार्य सोमशंकर महाजन, डॉ. राजकुमार कानडे, डॉ. शिवशंकर हरळय्या, माजी मुख्याध्यापक संजीव कुलकर्णी, प्रा. धनंजय मेनकुदळे, डॉ. शशि कानडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले. सूत्रसंचालन परमेश्वर सुतार यांनी केले. तर आभार शिवशंकर व्हंडरे यांनी मानले.


यांचा झाला गौरव

गुंडजीबापू मोरे, धनंजय खोंडे, किरण चौधरी, मनोजकुमार गुरव, रवींद्र मुगळे, सरस्वती जाधव यांचा आदर्श शिक्षक म्हणून तर अंकुश गायकवाड, भालचंद्र पोतदार यांचा क्रीडा गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.


 
Top