धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलने शालेय क्रीडा स्पर्धेत सालाबादाप्रमाणे याही वर्षी घवघवीत यश संपादन करीत प्रशालेतील यशात मानाचा शिरपेच रोवला आहे.
नांदेड येथे पार पडलेल्या शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रशालेतील 14 वर्ष वयोगटात इयत्ता सातवीत शिकणारी अपूर्वा रेड्डी तर इयत्ता सहावीत शिकणारा समरजीत देशमुख यांनी प्रतिस्पर्धेला आपल्या बुद्धीच्या असिम ताकतीवर पराभूत करून नांदेड येथे होणाऱ्या राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी दावेदारी ठोकली आहे. यासाठी प्रशालेचे क्रीडा शिक्षक चंद्रकांत कवितकर यांचे मार्गदर्शन या खेळाडूंना लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, संस्था सचिव प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक केशव पाटील, बी. बी. गुंड, कुमार निकम, बालाजी गोरे, राजेंद्र जाधव, शेषनाथ वाघ व क्रीडा विभाग प्रमुख अभिजीत पाटील यांनी या दोन्ही खेळाडूंचे व क्रीडाशिक्षकाचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

