धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या के टी पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालय धाराशिव येथील विद्यार्थी आदित्य नवनाथ चव्हाण (बी.सी.एस. तृतीय वर्ष) व ऋषिकेश चंद्रकांत वाघे (एम. एस सी प्रथम वर्ष) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सव 2026 च्या वादविवाद स्पर्धेत सुरुवातीला जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत यश संपादन केले. त्यानंतर दोन दिवसापूर्वी विद्यापीठ स्तरावर सदरील विद्यार्थ्यांनी आजचा युवक संधीच्या महासागरात की अपेक्षांच्या वादळात? या विषयावर वादविवाद स्पर्धेत यश मिळवले असून यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी तसेच प्र. कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांच्या हस्ते पारितोषिक मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, सचिव प्रेमाताई पाटील तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित मसलेकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
