तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव उत्साहात सुरू असून, आज बुधवार (14 ऑक्टोबर) रोजी देवींची नित्योपचार पूजा संपन्न झाली. शारदीय नवरात्रीतील आजची चौथी माळ आहे.
मंगळवार (13 ऑक्टोबर) रोजी देवींची वाघ या वाहनातून छबिना मिरवणूक काढण्यात आली. या छबिना मिरवणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद गंगणे, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी, पुजारी, सेवेकरी व भाविक उपस्थित होते.


