तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचे भक्त बसवराज पुजारी, रा. घानपूर, ता. चिंचोली, जि. कलबुर्गी (कर्नाटक) यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी 50 हजार रुपयांची देणगी अर्पण केली.

बसवराज पुजारी हे आपल्या कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी तुळजापुरात आले होते. यावेळी त्यांनी देवीच्या चरणी 50 हजार रुपयांची देणगी अर्पण केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते बसवराज पुजारी यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र भेट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

 
Top