धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्ली येथील मानाचा गणपती व धाराशिवचा महाराजा, म्हणून गणल्या गेलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळ गणपती उत्सवामध्ये 1991 मध्ये श्री काशिनाथ दिवटे यांनी समाजप्रबोधनासाठी ऐतिहासिक देखावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित श्री तुळजाभवानी माता  छत्रपती शिवाजी महाराजांना,  भवानी तलवार देत असलेला देखावा सादर केला होता.

त्यावेळी तुळजाभवानी मातेची ही मूर्ती काशिनाथ दिवटे यांनी बिना साच्याची, फक्त बोटाने बनविली गेलेली आहे , आज तागायत या मूर्तीची दैनंदिन पूजा केली जाते व नवरात्र घटस्थापने पासून ते विजयादशमी दसरा ,कोजागिरी पौर्णिमेपर्यंत  महोत्सव, 35 वर्ष अखंडपणे साजरा केला जातो.  नवरात्रीत सर्व तिर्थ क्षेत्राच्या ठिकाणी भयानक गर्दी असते व जवळुन दर्शन, तुळजाभवानी मातेच्या पायापर्यंत दर्शन घेण्यास संधी मिळत नाही. अशी सर्व भक्त  गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या  तुळजाभवानी मातेचे दर्शन सहजरीतीने मिळते.

नारळ, खण वाहून,ओटी भरण्याचे ही कार्यक्रम महिला वर्ग भक्तिभावाने अर्पण करीत  आहेत. विविध कार्यक्रमाचे नियोजन केले.  काशिनाथ दिवटे हे मंडळाच्या स्थापनेपासून ते आज 62 वर्षापासून मंडळाच्या विविध हलते देखावे समाज प्रबोधनात्मक बनवीत आलेले आहे. मंडळाकडून  मानधन व बिना मोबदला आपली भक्ती व समाजसेवा अर्पण करणारे , धाराशिव जिल्ह्यामध्ये एकमेव मूर्तिकार चित्रकार व कलाकारआहे. मंडळाच्याच कार्यात सहभाग असतो असे नव्हे ,तर राजे बाग येथील महादेवाच्या कपालेश्वराच्या या मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या पूर्व मंदिरास रंगरंगोटी दैनंदिन पूजा व पिंडीस एक वेगळ्या प्रकारच्या चालू असलेल्या  , दैनंदिन प्रसंग, सण, उत्सव, समय सुचकतेनुसार  महादेवाची पिंड त्यावरील असणारी ओम अक्षरापासून ते विविध रूपे बनवण्याचा आजतागायत दिवटे यांचे परिश्रम  आहेत .गवळी गल्लीतील श्री तुळजाभवानी मातेच्या या मूर्ती समोर यज्ञ इतर पूजा करीत आले आहेत. यानिमित्ताने महिला कुंकू मार्चन व देवीची विविध गाणी व गीत भक्ती अर्पण केली जात आहे. नवरात्र उत्सव आनंद व्यक्त करण्याचा ,भक्ती मार्गातून महिला आपली कला व क्षमता दाखविण्याचा प्रयत्न करीत आल्या आहेत. घटनास्थापने ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मंडळाचे सर्व महिला मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी अत्यंत आनंदमय व प्रसन्नतेच्या भक्तिमय वातावरणात पूजाविधी संपन्न करतात. मल्हार साखरे या आठ वर्षाच्या मुलांनी संबळ वाजवीत व उपाध्ये ताशा ढोल इत्यादी वाद्याच्या व घंटेच्या निनादात काशिनाथ दिवटे यांच्या मंजूर मंजुळ व गोड आवाजात विविध देवतांच्या आरतीने व मंत्र उच्चारणे केली जाते या दैनंदिन पूजा विधीच्या वेळी आई राजा उदो उदो , बोल भवानी की जय, तुळजाभवानी माते की जय , फटाक्याच्या आतषबाजीत व शोभेची दारू  उडवून संपन्न झाली.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top