भूम (प्रतिनिधी)- श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूमचा पहिलवान कुमार हिंदूराज हराळ (14 वर्ष वयोगटामध्ये 38 किलो वजनी गट ) याने जिल्हा क्रीडा स्पर्धा लातूर येथे आयोजित विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे. त्याचा सत्कार भूम पोलीस स्टेशनचे हेड चार्ज- डीवायएसपी अमोल मोहिते यांनी केला.
यावेळी श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूमचे मुख्याध्यापक किरण जाधव यांनी अमोल मोहिते यांचा सत्कार केला. त्यांचे सोबत आलेले हेड कॉनस्टेबल अजित कवडे यांचा सत्कार शाळेचे पर्यवेक्षक पोपट बांगर यांनी केला. यावेळी वस्ताद चांद सय्यद व धनंजय गाढवे यांचे ही सत्कार मुख्याध्यापक यांनी केले. श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्या मंदिर भूमचे मुख्याध्यापक राजेश भोरे हे ही यावेळी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमोल मोहिते यांनी सायबर क्राईम बद्दल जनजागृती केली. तसेच शाळेतील 18 वर्षाच्या आतील व ड्रायव्हिंग लायसन्स नसलेले विद्यार्थ्यांनी मोटरसायकल चालवू नये. तसेच शाळेतील सर्व मुलींना सांगितले. तुम्हाला शाळेत येताना जाताना एसटी स्टँडवर बस मध्ये कोणी छेडत असेल पाठीमागून गाडीवर येऊन अपशब्द बोलत असेल अशा छेडछाड करणाऱ्या मुलांची माहिती शाळेमध्ये शिक्षकाना,कॉल करून प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला द्यावी असे सांगितले.
