परंडा (प्रतिनिधी)- परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयास शिवसेनेचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, भाजपाचे सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ राऊत, शिवसेना उबाठाचे धाराशिव-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील, शिवसेना उबाठाचे उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी, कळंब मतदारसंघाचे माजी आमदार  दयानंद गायकवाड, शिवसेना धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख  अनिल खोचरे आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. 

या सर्व मान्यवरांचा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्वागत-सत्कार न करता, दुष्काळाची दाहकता तीव्र असून यावर चर्चा करून करावयाच्या उपाययोजना पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोहयोची कामे आणि दुष्काळामुळे उदभवणाऱ्या समस्या आदी विषयांवर संवाद होऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली. 

यावेळी धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व सदस्य धनंजय सावंत, भाजपा तालुका अध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक रमेशसिंह परदेशी, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, माजी सभापती व माजी जिल्हा परिषद सदस्य गौतम लटके, पंचायत समिती सदस्य केदार पाटील, नगरसेवक अविनाश विधाते, अकिब पठाण, अरूण बारबोले, रामचंद्र कुलकर्णी, सारंग घोगरे, अंगद मुरूमकर, मगनदास पवार, धनंजय काळे, संतोष गायकवाड, यशपाल बनसोडे, प्रमोद लिमकर, गौरव पाटील, मनोज पवार, अजिमभाई हन्नूरे, अमर ठाकूर, बालाजी गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top