तेर (प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय शूटिंग बॉल क्रीडा स्पर्धा तुळजाभवानी क्रीडा संकुल स्टेडियम धाराशिव येथे भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सतरा वर्षाखालील गटातून तेर येथील पीएमश्री जिल्हा परिषद उर्दू शाळेने जिल्हास्तरावर द्वितीय स्थान पटकाविले आहे. 

पहिल्या राउंड मध्ये तीन पैकी दोन सामने जिंकत फायनल मध्ये जाण्याचा मान मिळवत तेरच्या गटाने अंतिम सामना खेळला. यमगरवाडीच्या गटाला अटीतटीची लढत देऊन दोन शून्याने द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले असुन  जिल्हास्तरावर द्वितीय स्थान मिळवत शाळेने यश संपादन केले आहे. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शहा तय्यबअली  , शिक्षक वृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने  विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले जात आहे. त्याचप्रमाणे मुलींच्या गटातून शाळेने जिल्हास्तरावर द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.  विजयी गटाला ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शक म्हणून फुलमामडी तोफिकुल आलम आणि डॉ. मौला शेख यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेच्या आयोजन आणि व्यवस्थापन क्रीडा संकुलाचे ज्येष्ठ क्रिडा प्रशिक्षक  जावेद शेख यांनी केले.


 
Top