वाशी (प्रतिनिधी)- भैरवनाथ शुगर वर्क्स लि., वाशी (तांदुळवाडी) कारखान्याच्या गाळप हंगाम 202627 च्या बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी पूजन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (दि. 8 ऑक्टोबर) उत्साहात करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विक्रम सावंत यांनी शेतकऱ्यांनी भैरवनाथ शुगर वर्क्सला जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे, तसेच शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य व विक्रमी दर देण्यासाठी कारखाना कटिबद्ध असल्याचे सांगितले. अनिल सावंत यांनीही परिसरातील शेतकऱ्यांनी परिपक्व ऊस भैरवनाथ शुगर वर्क्सला देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, तालुकाप्रमुख ॲड. सत्यवान गपाट, विक्की चव्हाण, विकास तळेकर, नागनाथ नाईकवाडी, शिवहार स्वामी, सतीश शेरकर, प्रकाश शेटे, सुनील जाधवर, उद्धव घोलप, सौ. अलकाताई भालेर, प्रविण गायकवाड, नितीन रणदिवे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी-वाहतूक ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन बाळासाहेब मांगले यांनी केले, तर आभार शिवहार स्वामी यांनी मानले.
