तेर (प्रतिनिधी)- धाराशिव पंचायत समितीच्या सभापती गोकर्णा गोपाळ कदम यांनी वाणेवाडी व काजळा येथे सुरू असलेल्या खरीप पिकाच्या  नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकारी व शेतकरी  बांधवांशी संवाद साधला व पिकाची पाहणी केली संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना पंचनामा व्यवस्थित करून लवकरात लवकर नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.

 सर्व शेतकऱ्यांचे 90 ते100 टक्के नुकसान झाले आहे. यासाठी शासनाकडून भरीव नुकसान भरपाई व पिक विमा मिळवण्यासाठी आ राणाजगजीतसिंह पाटील यांच्यामार्फत  प्रयत्न करण्याचे सर्व शेतकऱ्यांना  सभापती कदम यांनी आश्वासित केले. खरीप पिक नुकसानीचा  पंचनामा करण्यासाठी तलाठी मुळे , कृषी सहाय्यक धवण शिनगारे , वानेवाडीचे ग्रामपंचायत अधिकारी कांबळे , पोलीस पाटील मनिषा घेवारे, प्रदीप घेवारे, गोपाळ कदम, सर्जेराव जाधव, संजय उंबरे ,गणपत चव्हाण,  सोमनाथ  उंबरे, राजेश्वर उंबरे, दत्ता कदम आदी उपस्थित होते.

 
Top