परंडा (प्रतिनिधी)- परंडा शहरातील कुऱ्हाड गल्ली येथील जेष्ठ नागरिक कुसूम देविदास डाके (वय 81) यांचे गुरुवारी दि.1 रोजी सकळी 9 :30 वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर दुपारी 4 वाजता दर्गाह रस्त्या जवळील हिंदु स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी राजकीय तसेच सामाजिक, शैक्षणिक व व्यापारी वर्गातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्या कल्याणसागर बँकेतील कर्मचारी जगदीश डाके व पत्रकार किरण डाके, नरेश डाके यांच्या मातोश्री होत.
