लातूर (प्रतिनिधी)- दिनांक 13ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अतनूर येथे येथे मूल्यवर्धन प्रशिक्षण वर्ग पहिली ते आठवी साठी आयोजित केले होते हे प्रशिक्षण श्री गोपीनाथ केंद्रे सरांनी अतनूर केंद्रातील पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेत पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या शिक्षकांना दिले अतिशय सखोल असे मार्गदर्शन श्री गोपीनाथ केंद्रे सरांनी केले विद्यार्थ्यांना चांगली सवय लागावी व विद्यार्थी शाळेत कसे शिस्तीत वागतील याविषयीचे सखोल मार्गदर्शन श्री केंद्रे सरांनी केले अनेक उदाहरणे अनेक प्रात्यक्षिक व गीत गायनातून मूल्यवर्धनाचे धडे श्री केंद्रे सरांनी अतनूर केंद्रातील शिक्षकांना दिले हे प्रशिक्षण ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी के पी बिरादार साहेब व मंगरूळ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री पेठे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी सर्व शिक्षक व मुख्याध्यापक या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.
